Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यवतमाळ, अकोल्यात पावसाची हजेरी
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: mn3
मराठवाड्यात पावसाचा इशारा
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
ऐन उन्हाळ्यात अकोला आणि यवतमाळमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. अकोल्यात शनिवारी रात्री 1 च्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. शहरासह आजूबाजूच्या परिसराला या पावसाने चांगलाच तडाखा दिला. या जोरदार वादळी वार्‍याचा तडाखा संपूर्ण शहरासह आजूबाजूच्या परिसरालाही बसला. पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झाले नसले तरी उकाड्याने हैराण झालेल्या अकोलावासीयांना दिलासा मिळाला. अकोल्यासह मूर्तिजापूर आणि इतर भागातही जोरदार पाऊस बरसला.
यवतमाळमध्येही रात्री हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शहरात ढगाळ वातावरण आहे. पावसानंतर यवतमाळकरांची धावपळ उडाली होती. मात्र पावसाच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: