Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण येथून युवक बेपत्ता
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 12 : कराड येथे कॉलेजला जातो असे सांगून पाटण येथील साईराज बापू चव्हाण (वय 20) हा बेपत्ता झाल्याची फिर्याद बापू सखाराम चव्हाण यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत माहिती अशी, पाटण येथील एस.टी. कॉलनीतील साईराज चव्हाण हा गुरुवारी (दि. 8) कराड येथे कॉलेजला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. तो अद्याप घरी परतला नसल्याची फिर्याद त्याचे वडील बापू चव्हाण यांनी दिली आहे. हवालदार एस. बी. राक्षे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: