Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कार्ती यांना 24 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले कार्ती चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळला असून कार्ती यांची 24 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कार्ती यांना 28 फेब्रुवारी रोजी चेन्नई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सीबीआय कोठडीत असलेल्या कार्ती यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. कार्ती यांच्या कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना विशेष न्यायाधीश सुनील राणा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. कार्ती यांची गेल्या 12 दिवसांपासून कसून चौकशी करण्यात आली असल्याने आता त्यांची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी मागणी आज सीबीआयच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.
स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्याची विनंती फेटाळली
कार्ती यांच्यावतीने आज वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी बाजू मांडली व कार्ती यांच्या कोठडीत वाढ करण्यास विरोध केला. कार्ती हे देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. अर्थात त्यांना दहशतवाद्यांपासूनही धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांना तिहार कारागृहात स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यात यावे तसेच त्यांना विशेष सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती कृष्णन यांनी केली. ही विनंतीही न्यायालयाने फेटाळली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: