Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राकुसलेवाडी येथे शॉर्टसर्किटने पाच घरे जळून खाक
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 12 : सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल 11 लाख 57 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की राकुसलेवाडी येथे रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास शॉकसर्किट झाले. शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजारील नागरिक घराबाहेर पडले. नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेली. एकापाठोपाठ एक अशी पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यापैकी चार घरे आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या  मदतीने ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत रत्नमाला आनंदराव मोरे यांच्या घराचे 4 लाख 66 हजार 500 रुपये, नंदा श्रीरंग मोरे यांचे 3 लाख 65 हजार 500 रुपये, अरुण रामचंद्र मोरे यांचे 1 लाख 40 हजार 500 रुपये, लक्ष्मण यशवंत मोरे यांचे 1 लाख 67 हजार 500 रुपयांचे तर चंद्रकांत यशवंत मोरे यांचे 1 लाख 7 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी महेश चव्हाण यांनी पंचनामा करून याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: