Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहावीचा विद्यार्थी दुचाकी चोरुन वापरत असल्याचेउघड
ऐक्य समूह
Tuesday, March 13, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 : सातार्‍यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमधील अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरुन वापरत  असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी वाहतूक विभागातील पोलिसांमुळे उघड झाली  असून संबंधित मुलाने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. संबंधित संशयित विद्यार्थी दहावीला असून त्याची परीक्षा सुरु आहे. ही परीक्षा झाल्यानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी वाहतूक विभागाचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी एका दुचाकीवरुन संबंधित अल्पवयीन मुलास पोलिसांनी अडवले आणि त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रे मागितली. दहावीला असल्याचे सांगून त्याने पोलिसांना जाण्याची  विनंती केली. त्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दंड भरावा लागेल, असे सांगताच त्याने 500 रुपयांची नोट दिली. दहावीच्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्याकडे 500 ची नोट बघितल्यानंतर कर्मचार्‍याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी मुलाने पायी चालण्याचा कंटाळा येत असल्याने दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला  पोलीस ठाण्यात आणले व कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती दिली. मुलगा अल्पवयीन असून व दहावीचे शालेय पेपर असल्याचे समोर आल्याने त्याला नोटीस देवून नंतर कारवाई केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ शिंदे व सुरज रेळेकर यांनी ही कारवाई केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: