Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

अजिंक्यतारा कारखान्यावर गुरुवारी निकाली कुस्त्यांचे मैदान
ऐक्य समूह
Tuesday, March 27, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: sp1
5सातारा, दि. 26 : आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर गुरुवार, दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. या मैदानात 100 कुस्त्या होणार असून महिला कुस्तीगीरांच्याही तीन कुस्त्या होणार आहेत. या मैदानातील मल्लांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या आखाड्यात पहिली कुस्ती अजय गुजर (पंजाब केसरी) आणि सतेंदर मोखरिया (भारत केसरी, दिल्ली) यांच्यात होणार आहे. या कुस्तीसाठी 2 लाख 25 हजारांचे बक्षीस आहे. दुसरी कुस्ती कौस्तुभ डफळे (राष्ट्रीय चॅम्पियन, पुणे) आणि विलास डोईफोडे (उपमहाराष्ट्र केसरी, पुणे) यांच्यात होणार असून 1 लाखाचे बक्षीस आहे. तिसरी कुस्ती गोकुळ आवारे (मल्लसम्राट केसरी, पुणे) आणि योगेश बोंबाळे (भारत केसरी, कोल्हापूर) यांच्यात होणार आहे. चौथी कुस्ती विकास जाधव (उपमहाराष्ट्र केसरी, पुणे) आणि सोनू (महान भारत केसरी, सेनादल) यांच्यात होणार असून या कुस्त्यांसाठी प्रत्येकी 1 लाखाचे बक्षीस आहे. पाचवी कुस्ती अमोल फडतरे (महाराष्ट्र चॅम्पियन, नागाचे कुमठे) आणि पै. राजन तोमर (आंतरराष्ट्रीय विजेता, सेनादल) यांच्यात होणार असून या कुस्तीसाठी 75 हजाराचे बक्षीस आहे.
या प्रमुख कुस्त्यांशिवाय देशभरातील नामवंत मल्लांच्या 95 कुस्त्या होणार आहेत. पै. कु. प्रणाली कदम (भरतगाव) विरुद्ध पै. कु. प्रणोती काळे (आर्वी), पै. कु. सिद्धी कणसे (अंगापूर) विरुद्ध पै. कु. श्रुती येवले (आर्वी) आणि पै. कु. श्रावणी भोसले (नागझरी) विरुद्ध पै. कु. प्राची कुदळे (भरतगाव) या महिलांच्याही कुस्त्या होणार असून या कुस्त्या विशेष आकर्षण ठरणात आहेत. संग्राम पिसाळ विरुद्ध वरदराज शिंदे या बाल मल्लाची कुस्तीही होणार आहे. विजेत्या मल्लांना आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येणार आहेत. दादोजी कोंडदेव पुरस्कारविजेते पै. दिनकरराव सूर्यवंशी, राज्य कुस्ती संघटक पै. नंदकुमार विभूते, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पै. उत्तमराव पाटील, पै. गोविंद पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
समालोचक म्हणून शंकर पुजारी तर हलगी वादक मारुती मोरे (खानापूर) यांचेही
आकर्षण राहणार आहे. या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पै. रामभाऊ जगदाळे, रवींद्र कदम, राजू भोसले, दिलीप निंबाळकर, हणमंतराव कणसे (गुरुजी), पै. उत्तमराव नावडकर, चंद्रकांत घोरपडे, पांडुरंग कणसे, पै. कांता जाधव, नामदेव सावंत, पै. जितेंद्र कणसे, देवानंद पिसाळ यांनी केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: