अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील कुस्ती मैदानाने डोळ्यांचे पारणे फेडले
ऐक्य समूह
Saturday, March 31, 2018 AT 11:29 AM (IST)
5सातारा, दि. 30 : अजिंक्यतारा उद्योग समूहाचे मार्गदर्शक आणि सातारा- जावली मतदारसंघाचे आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्यावतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी झालेल्या निकाली कुस्ती स्पर्धेला राज्यभरातून हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते.
या मैदानात 109 निकाली कुस्त्या झाल्या. रंगतदार कुस्त्यांमुळे उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. स्पर्धेतील
खास आकर्षण असलेल्या प्रथम क्रमांच्या कुस्तीत पै. कौस्तुभ डाफळे (राष्ट्रीय चॅम्पियन, काका पवार तालीम, पुणे) याने प्रतिस्पर्धी पै. ज्ञानेश्वर गोचडेे ़(पुणे) याचा पराभव करून उपस्थितांची
वाहवा मिळवली. विजेत्या मल्लांना आ. शिवेंद्रसिंहराजे व मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देवून
गौरविण्यात आले.
याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत सातारा तालुक्यातील जनतेच्यावतीने सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संयोजकांचे कौतुक करून ते म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराजांनी आखाडा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. मध्यंतरी खंड पडला होता परंतु, त्यांची स्मृती जागविण्याच्या दृष्टीने पुन्हा सर्वांच्या सहकार्याने आखाडा सुरू करण्यात आला. यापुढेही यापेक्षा दर्जेदार आखाडा आणि मोठ-मोठ्या कुस्त्या घेण्याचा मनोदय व्यक्त केला. कुस्ती जीवंत राहिली पाहिजे. कुस्तीला चालना मिळाली पाहिजे, ग्रामीण भागात चांगले मल्ल तयार झाले पाहिजेत. यासाठी गेली आठ वर्षापासून हा उपक्रम राबिवला जात असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी उपस्थित जुने हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी तसेच जुने नामांकित मल्ल, कुस्ती कोच, पैलवान व वस्ताद आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या जंगी मैदानाचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, दिलीपराव निंबाळकर, धर्मराज घोरपडे, राजाराम जाधव, चंद्रकांत घोरपडे, उत्तमराव नावडकर, हणमंतराव कणसे व कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेसाठी सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणचे नामांकित पैलवान आले होते. खास आकर्षण असणारी प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. कौस्तुभ डाफळे आणि प. ज्ञानेश्वर गोचडे यांच्यामध्ये झाली. ही कुस्ती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पै.रामभाऊ जगदाळे, राजू भोसले, पै.उत्तमराव नावडकर यांच्या हस्ते लावण्यात आली. या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस प्रारंभ होताच दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत चढाई केली. मात्र दोघांचेही बलाबल समान ठरल्यामुळे पै.कौस्तुभ डाफळे हा पंचांच्या गुणावर विजयी झाला. दोन नंबरची कुस्ती पै. गोकुळ आवारे (मल्ल सम्राट केसरी) पुणे विरुद्ध पै.योगेश बोंबाळे (भारत केसरी)यांच्यामध्ये कुस्ती लावण्यात आली. ही कुस्ती अटीतटीची झाली. यामध्ये भारत केसरी पै.योगेश बोंबाळे विजयी झाला. तीन नंबरची कुस्ती पै.विकास जाधव (उप महाराष्ट्र केसरी) काका पवार तालीम पुणे व पै. सोनू (महान भारत केसरी) सेना दल तालीम, पुणे यांच्यामध्ये झाली. या कुस्तीत पै.विकास जाधव विजेता ठरला. चौथी कुस्ती महाराष्ट्र चँपियन पै.अमोल फडतरे व आंतरराष्ट्रीय विजेता पै.राजन तोमर यांच्यामध्ये होवून ही लढत पै.राजन तोमर याने जिंकली. ही कुस्ती सुद्धा आकर्षक ठरली.
पाचवी कुस्ती पै. नीतलेश लोखंडे (महाराष्ट्र चँपियन) काका पवार तालीम पुणे, विरुद्ध पै. प्रेमकुमार (राष्ट्रीय चँपियन) सेना दल तालीम पुणे, यांच्यामध्ये कुस्ती लढत झाली. त्यामध्ये पै.नीलेश लोखंडे विजेता ठरला. याबरोबरच अशा 109 चटकदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणार्या लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. प्रत्येक कुस्तीला कुस्ती शौकिनांनी भरभरून टाळयांच्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला. या कुस्ती मैदानाला पै.दिनकरराव सूर्यवंशी(दादोजी कोंडदेव पुरस्कार),पै.उत्तमराव पाटील(इंटरनॅशनल चॅम्पियन कोच), पै. साहेबराव जाधव (उपमहाराष्ट्र केसरी), पै. शिवाजीराव पाचपुते (महाराष्ट्र केसरी), पै. नंदकुमार विभूते (महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटक), पै. प्रा. दिलीप पवार (कोच-सेना दल), पै. प्रा. दुर्योधन ननावरे (कुस्ती कोच), पै. बलवंतसिंग (सेना दल कोच), पै. बलभीम भोसले (एकसळ), पै. सोपान शिंगाडे (सेना दल कोच), पै. आत्माराम पिसाळ (मेजर सुभेदार),पै.दादासाहेब सावंत (कुस्ती कोच), पै. नजरुद्दीन नायकवडी (कुस्ती कोच) आदी नामवंत कुस्तीगीर आणि मल्लांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, धनंजय शेडगे, फिरोज पठाण, विक्रम पवार, गणपतराव शिंदे, पंडितराव सावंत, रामभाऊ जगताप, बाळकृष्ण फडतरे, मिलिंद कदम, जितेंद्र सावंत तसेच सातारा, सांगली,
कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील व परिसरातील कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.
कुस्ती पंच म्हणून उत्तमराव पाटील, दिलीप पवार, सदाशिव गायकवाड, कांता जाधव, पै.नंदकुमार जगदाळे, पै.जितेंद्र कणसे यांनी काम पाहिले. कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पै.रामभाऊ जगदाळे, राजू भोसले, दिलीप निंबाळकर, हणमंतराव कणसे (गुरुजी), पै. उत्तमराव नावडकर, चंद्रकांत घोरपडे, पांडुरंग कणसे (सर), पै. कांता जाधव, राजाराम जाधव, नामदेव सावंत, पै. जितेंद्र कणसे, देवानंद पिसाळ यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रसिद्ध समालोचक पै. शंकर पुजारी व पांडुरंग कणसे यांनी कुस्ती स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन केले. शंकर पुजारी यांनी समालोचन करते वेळी, महाराष्ट्रात जेवढे आखाडे आहेत त्यात एक नंबरचा आखाडा अजिंक्यतारा कारखान्यावर भरत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. हलगी वादक मारुती मोरे व त्यांच्या सहकार्यांनी हलगी वादन करून स्पर्धेत आपल्या शैलीने जाण आणली.