Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत
ऐक्य समूह
Wednesday, April 04, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : इराकमधील मोसूल येथे जून 2014 मध्ये 40 भारतीयांचे ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांनी अपहरण
केले होते. त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. उर्वरित 39 भारतीयांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या भारतीयांचे मृतदेह सोमवारी खास विमानाने भारतात आणण्यात आले.
या भारतीयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये
मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी
केली.
इराकमध्ये भारतीयांची हत्या झाल्याच्या वृत्ताला साडेतीन वर्षांनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला होता. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग हे रविवारी या सर्व
भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी इराकला रवाना झाले होते. सोमवारी दुपारी 39 पैकी 38 भारतीयांचे मृतदेह अमृतसरमध्ये आणण्यात आले. एका मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. 39 पैकी 27 जण पंजाबचे, चार जण हिमाचल प्रदेशचे, सहा जण बिहारचे तर दोन जण पश्‍चिम बंगालचे रहिवासी होते. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी दुपारी केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: