Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संयुक्त राष्ट्रांची दहशतवाद्यांची नवी यादी दाऊद, हाफिजसह 139 पाकड्यांचा समावेश
ऐक्य समूह
Thursday, April 05, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) आंतरराष्ट्रीय दहशतवादी व दहशतवादी संघटनांची नवी यादी जाहीर केली असून त्यामध्ये 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे वृत्त ‘द डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे. या यादीमुळे पाकची पुरती नाचक्की झाली आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी भारताला हवा असलेला माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफिज सईद यांचा या यादीत समावेश आहे. या यादीत दाऊदचा कराचीतील पत्ता देण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत ओसामा बिन लादेनचा वारसदार आणि ‘अल-कायदा’चा म्होरक्या अयमान-अल-जवाहिरीचा समावेश आहे. जवाहिरी हा अफगाणिस्तान सीमेजवळ पाकिस्तानमध्येच लपून बसल्याचे ‘यूएनएससी’ने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये राहून दहशतवादी कारवाया करणार्‍या 139 दहशतवाद्यांचा या यादीत समावेश आहे. माफिया डॉन दाऊद इब्राहिमकडे अनेक बनावट पासपोर्ट आहेत. रावळपिंडी आणि कराचीतून हे पासपोर्ट जारी करण्याते आले होते. कराचीत दाऊदचा बंगला असल्याचे ‘यूएनएससी’ने म्हटले आहे. मेक्सिकोतील ड्रग माफियांप्रमाणे दाऊदच्या ‘डी’ कंपनीनेही वेगवेगळ्या धंद्यांमध्ये बस्तान बसवले आहे. ही टोळी शस्त्रास्त्रांची तस्करी, बनावट डीव्हीडी, खाजगी आर्थिक सेवा, हवाला अशा धंद्यांमध्ये असल्याचे अमेरिकेेच्या अधिकार्‍यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते. संयुक्त राष्ट्रांच्या यादीत 26/11 च्या मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईदचाही समावेश आहे. 
सईदच्या दहशतवादी संघटनेचाही या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर सईदचे साथीदार हाजी मोहम्मद याह्या मुजाहिद, अब्दुल सलाम व झफर इक्बाल यांचाही या यादीत समावेश आहे. येमेनचा नागरिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मोहम्मद-बिन-अल-शेबाह याचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय ‘तोयबा’शी संबंधित अल मन्सुरियन, पासबान-ए-काश्मीर, जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फौंडेशन, अल रशीद ट्रस्ट, हरकत-उल-मुजाहिद्दीन, इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, वफा मानवीय संगठन, जैश-ए-मोहम्मद, रबिता ट्रस्ट, लष्कर-ए-झांगवी, तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, या दहशतवादी संघटनांचाही या यादीत समावेश आहे.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: