Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

केकेआरचा आरसीबीवर 4 गडी राखून दणदणीत विजय
ऐक्य समूह
Monday, April 09, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: sp1
5कोलकाता, दि. 8 (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या 11 व्या मोसमातील कोलकाता नाईट रायडर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांदरम्यान झालेल्या सामन्यात सुनील नारायण याच्या 19 चेंडूत 50 धावा व दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण पारीच्या (नाबाद 35 धावा) बळावर आज केकेआर संघाने आरसीबीचा 4 गडी राखून पराभव केला.
नाणेफेकचा कौल हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 6 गडी गमावत 176 धावा करत कोलकाताच्या संघासमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले होते. 177 धावांचे लक्ष्य घेवून केकेआरकडून खेळण्यास आलेल्या सुनील नारायण याने ख्रिस लीनच्या साथीने सुरूवात केली. प्रथम सावध खेळत नंतर फटकेबाजी करत 19 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. परंतु ख्रिस लीन 5 धावा काढून परतला. त्यानंतर रॉबिन उथप्पा खेळण्यास आला. परंतु तो देखील 13 धावा काढून परतला. त्यामुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याच्यावर संघाची जबाबदारी आली. त्याने नितीश राणाच्या साथीने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी संघाची धावगती वाढवत संघाला विजया समिप आणले. परंतु नितीश राणा 34 धावा काढून तंबूत परतला. त्यामुळे केकेआरच्या गोटात पुन्हा एकदा शांतता पसरली. त्यानंतर दिनेश कार्तिकला साथ करण्यासाठी रिंकू सिंह आला. परंतु तोही फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याच्या पाठोपाठ आंद्रे रसेल हाही 15 धावा काढून परतला. एकवेळी केकेआरचे सहा गडी बाद झाले असताना दिनेश कार्तिक याने कर्णधाराला साजेशी खेळी खेळत संघाला 18.5 व्या षटकातच विजय मिळवून दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: