Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात दोन जवान शहीद
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn3
पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी भूसुरुंगांचे साखळी स्फोट
5बिजापूर, दि. 9 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी छत्तीसगड दौर्‍याच्या पाच दिवस आधी नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सुरक्षा दलातील जवानांच्या बसला लक्ष्य केले. या स्फोटात दोन जवान शहीद झाले असून पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात बिजापूरच्या मुख्य मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी साखळी भूसुरुंग स्फोट घडवून आणले. या स्फोटांनी विजापूरच्या मुख्य मार्गाचे नुकसान झाले आहे. हा हल्ला विजापूरच्या महादेव घाटी आणि चिन्नाबोडकेल येथे झाला. नक्षलवाद्यांनी जवानांची बसही स्फोटाने उडवून दिली. त्यात दोन जवान शहीद झाले तर   पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2005 पासून आतापर्यंत सुरक्षा दलांचे 47 जवान शहीद झाले आहेत. सप्टेंबर 2005 मध्ये बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसला लक्ष्य केले होते. त्यात 22 जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी ही बस उडवून देण्यासाठी तब्बल 200 किलो स्फोटकांचा वापर केला होता.
पंतप्रधान मोदी हे 14 एप्रिलला नक्षल प्रभावित बिजापूर जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ते जांगला येथे ‘पंतप्रधान पेयजल योजने’च्या समस्येबाबत येथील 40 कुटुंबीयांची भेट घेतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होणार आहेत. त्यांची एक जाहीर सभाही होणार आहे. त्यामुळे या दौर्‍यापूर्वीच सुरक्षा दलांवरी हल्ला आणि भूसुरुंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: