Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

हैद्राबादने गाठले विजयाचे ‘शिखर’
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: sp2
पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात राजस्थान पराभूत
5हैद्राबाद, दि. 9 : सनरायजर्स हैद्राबाद आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करणार्‍या राजस्थान रॉयल्स यांच्यात आज रंगलेल्या सामन्यात हैद्राबादने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनने नाबाद 77 धावांच्या फटकेबाज खेळीमुळे हैद्राबादला सहज विजय मिळवता आला.
सनरायजर्सचा कर्णधार धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत राजस्थान रॉयल्सला केवळ 125 धावांत रोखले. हे आव्हान हैद्राबादने एका गड्याच्या मोबदल्यात पार केले. वृद्धिमान साहा बाद्रझाल्यावर शिखर धवनने 13 चौकार आणि 1 षटकार ठोकत 57 चेंडूत  नाबाद 77 धावा चोपल्या.
तत्पूर्वी, हैद्राबादच्या गोलंदाजांच्या भेदक मार्‍यावर अजिंक्य रहाणे 13 धावांवर, बेन स्टोक्स 5 धावांवर तर राहुल त्रिपाठी 17 धावांवर बाद झाला. डी आर्की शॉर्ट 4 धावांवर धावबाद झाला. संजू सॅमसनच्या 49 धावांच्या जोरावर राजस्थानने कशीबशी 125 ची मजल मारली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: