Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता चेहर्‍याच्या क्रीमसाठीही डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन लागणार
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : सौंदर्य उजळण्यासाठी चेहर्‍यासाठी एखादी क्रीम जाहिराती पाहून यापूर्वी विकत घेता येत होती. मात्र, आता फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन लागणार आहे. केंद्र सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन असल्याशिवाय फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत. या फेअरनेस क्रीममध्ये स्टेरॉईड आणि अँटिबायोटिक्सचा समावेश असल्याचे समोर आले आहे. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेल्या क्रीम्स   डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहर्‍याला फासणे धोकादायक आहे. केंद्र सरकारने स्टेरॉईड असणार्‍या क्रीम्सना ‘ओव्हर द काऊंटर’च्या विक्री यादीतून काढून ‘शेड्युल-एच’मध्ये टाकले आहे. या अंतर्गत अशा प्रकारच्या फेअरनेस क्रीम्स विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आवश्यक करण्यात आले आहे. स्टेरॉइडमिश्रित क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणार्‍यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेरॉईड आणि अँटिबायोटिकचा समावेश असलेल्या 14 क्रीम्सच्या विक्रीवर बंदी आणली आहे. या नियमांचे पालन केले नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतची सूचना 23 मार्च रोजी देण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: