Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: lo4
एकेरी वाहतूकही शिथिल करण्याचे आदेश
5सातारा, दि.13 : सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे.   त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एस. टी. बसेस, अवजड वाहनांना आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा रस्ता बंद होणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 13 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील मोती चौक ते शाहू चौक तसेच मोती चौक ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका एकेरी वाहतूक व्यवस्था पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्यात येत आहे.
 एस.टी. बसेस व अवजड वाहनांना दैनंदिन वाहतुकीस पर्यायी असणारा मार्ग पुढीलप्रमाणे- एस.टी. स्टँड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटाकडे जाणार्‍या एस. टी. बसेस,  जड-अवजड वाहने बस स्टँड भूविकास बँक-जुना आर.टी.ओ. चौक -वाढे फाटा मार्गे जातील. एस. टी. स्टँड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा कडे जाणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टँड-पारंगे चौक-सिव्हिल हॉस्पिटल-मुथा चौक-बांधकाम भवन-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे जातील. ए.टी.स्टँड परिसरातून बोगद्यामार्गे तसेच कासकडे जाणार्‍या एस.टी. बसेस, जड अवजड वाहने राधिका सिग्नल-राधिका रोड मार्गे राधिका टॉकिज-मोती चौक-चांदणी चौक-समर्थ मंदिर मार्गे जातील. शहरात प्रवेश करण्यासाठीचा मार्ग पुढीलप्रमाणे राहील. कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड-अवजड वाहने शिवराज फाटा-अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे न येता खेड फाटा - सैनिकनगर - सदरबझार - सेंट थॉमस एलफिस्टन चर्च- रिमांडहोम- जुना आर. टी. ओ. चौक मार्गे बस स्टँड परिसराकडे येतील. बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने समर्थ मंदिर-मोती चौक-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटी-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टँड परिसराकडे येतील. बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शाहू चौक-अलंकार हॉल कॉर्नर-आर. के. बॅटरी-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटीज-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टँड परिसराकडे येतील. एस.टी.स्टँडकडून पोवई नाका मार्गे जाणारे वाहनांकरिता काँग्रेस भवन ते पोवई नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरता बंद करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहील. काँग्रेस भवन ते प्रिया व्हरायटी-आर. के. बॅटरी कॉर्नर, बस स्टँड ते पारंगे चौक - मुथा चौक - बांधकाम भवन. राधिका सिग्नल-राधिका रोड-राधिका टॉकीज चौक मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध आहेत. पार्किंग व नो पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. हॉटेल मिलन ते हॉटेल मोनार्क (मरिआई कॉम्प्लेक्स साताराच्या पाठीमागे) या जाणार्‍या रोडवर हॉटेल महाराजाचे पाठीमागील गेट ते हॉटेल गुलबहारचे पाठीमागील गेटपर्यंत रोडच्या उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत. पार्किंग दिलेला मार्ग सोडून या मार्गावर इतरत्र कोठेही वाहने पार्किंग करू नयेत. या मार्गावरील पूर्वीची सम-विषम पार्किंग व्यवस्था स्थगित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: