Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दत्तनगर (वाई) येथे फ्लॅटमधून 2 लाखाचा मुद्देमाल लंपास
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: re3
5वाई, दि. 13 ः दत्तनगर (वाई) येथील रवीराज दिलीप शिंदे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप भर दुपारी फोडून 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दत्तनगर येथील कॅनॉल शेजारील महेंद्र चौधरी यांच्या बिल्डिंगमध्ये रवीराज शिंदे आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात असून दुपारी 1 च्या सुमारास ते गंगापुरी येथे कुटुंबीयांसमवेत कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान अज्ञाताने फ्लॅटचे कुलूप तोडून 50 हजार रुपये रोख व 8 तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत वाई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब एडगे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: