Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडाप जीपला आयशर टेम्पोची धडक
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re2
नागठाणे येथील घटना, 9 जखमी, तिघे गंभीर
5नागठाणे, दि. 13 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळ्या-पिवळ्या प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपला पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर गाडीने ( क्र. एम. एच. 09 बीसी 3315) जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले असून तिघे जण गंभीर जखमी आहेत.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की नागठाणे येथील सारमाँडी फाटा येथे सातारकडून नागठाणेकडे निघालेल्या व प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या वडाप जीपला कोल्हापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पो (क्र. एम. एच. 09 बीसी 3315) ने पाठीमागून जोरदार धडक दिली.   
ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पाठीमागील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यावेळी गाडीतून उतरणारे व गाडीमध्ये असलेले प्रवासी जखमी झाले. धडक झाल्यानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे लोकांनी तसेच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आले व जखमींना तातडीने उपचारासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच गंभीर जखमींना जिल्हा सर्वसाधारण रूग्णालय येते हलवण्यात आले. गंभीर जखमींची नावे पुढीलप्रमाणे- स्वाती विजय मोरे (खोजेवाडी), शमा सुर्वे (खोजेवाडी) व आणखी एक अनोळखी महिला (नाव समजू शकले नाही. यांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. तर किरकोळ जखमींमध्ये -सुरेश रामचंद्र घाडगे (सदरबझार, सातारा), गणपत जयवंत शिंदे (शाहूपुरी, सातारा), रमेश रामचंद्र पवार (निगडी), सुनंदा विजय भंडारी, सुजय सुनील निंबाळकर व गौरी सुनील निंबाळकर (दोघेही रा. कोंडवे, सातारा).

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: