Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेंद्रे येथे अपघातात भक्तवडीचा युवक ठार
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गावर गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकीची सातारा पोलीस व्हॅनला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात विकी महेंद्र वाघमारे (वय 26, रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) हा युवक ठार झाला.  याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मृत युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास विकी वाघमारे हा टीव्हीएस (क्र. एम. एच. 11-सी. के. 6942) या दुचाकीवर धनंजय जाधव याच्यासमवेत निघाला होता. विकी वाघमारे हा दुचाकी चालवत होता  तर धनंजय पाठीमागे बसलेला होता. शेंद्रे गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी आल्यानंतर त्यांनी पुढे निघालेल्या (क्र. एम. एच. 11-ए. बी. 8236) या व्हॅनला धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की दुचाकी पुन्हा उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या घटनेत विकी व धनंजय दोघे गंभीर जखमी झाले. जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये विकी वाघमारे हा मृत झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्राांनी सांगितले. तालुका पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेवून पंचनामा केला. फौजदार एस. बी. जाधव यांनी मृत विकी वाघमारे याच्याविरुध्द वाहन चालवण्याचा परवाना नसताना हयगय करुन वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस जबाबदार ठरुन एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: