Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात पहिला
ऐक्य समूह
Saturday, April 28, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: na2
यूपीएससीचा निकाल जाहीर; राज्यात 16 विद्यार्थी उत्तीर्ण
5नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यात पहिला तर देशात विसावा आला आहे. आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या मुलानेही या परीक्षेत बाजी मारली आहे. दिग्विजय बोडके हा राज्यात 54 वा आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2017 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत महाराष्ट्रातील 16 विद्यार्थी यशवंत ठरले आहेत. गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. दिग्विजय बोडके (54 वा क्रमांक), सुयश चव्हाण (56 वा क्रमांक), भुवनेश पाटील (59 वा क्रमांक), पियुष साळुंखे (63 वा क्रमांक), रोहन जोशी (67 वा क्रमांक),  राहुल शिंदे (95 वा क्रमांक), मयूर काटवटे (96 वा क्रमांक), वैदेही खरे (99 वा क्रमांक), वल्लरी गायकवाड (131 वा क्रमांक), यतिश विजयराव देशमुख (159 वा क्रमांक), रोहन बापूराव घुगे (249 वा क्रमांक), श्रीनिवास वेंकटराव पाटील (275 वा क्रमांक), प्रतीक पाटील (366 वा क्रमांक), विक्रांत सहदेव मोरे (430 वा क्रमांक), तेजस नंदलाल पवार (436 वा क्रमांक) यांनीही या परीक्षेत बाजी मारली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: