Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाय-फायच्या सहाय्याने मोबाइलवरून कॉल शक्य होणार
ऐक्य समूह
Thursday, May 03, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na1
इंटरनेट टेलिफोनीला सरकार लवकरच मान्यता देणार
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : मोबाइलचे नेटवर्क नसलेल्या किंवा नेटवर्क खराब असलेल्या एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यावर मोबाइलवरून कॉल करणे अशक्य होते. त्यामुळे अनेकांची गोची होत होती. मात्र, आता यावर तोडगा निघणार आहे. यापुढे मोबाइल नेटवर्क नसले तरी वाय-फाय ब्रॉडबँडचा वापर करून लँडलाइन व मोबाइल फोनवरून कॉल करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी इंटरनेट टेलिफोनीचा प्रस्ताव स्वीकारला असून लवकरच देशभरात इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देणार आहे.
टेलिकॉम ऑपरेटर्स आणि ज्यांनी टेलिफोनीचे लायसन्स घेतले आहे, अशा कंपन्या तुम्हाला नव्या मोबाइल क्रमांकाची ऑफर करू शकतात. विशेष म्हणजे, या मोबाइल क्रमांकासाठी तुम्हाला सिमकार्डची गरज लागणार नाही. इंटरनेट टेलिफोनीचे अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही   तुमचा नवा मोबाइल क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.
‘ट्राय’च्या नियामक मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या संबंधी प्रस्ताव मांडला होता. मोबाइल नेटवर्क मध्येच गायब झाल्याने कॉल ड्रॉपच्या समस्येला नेहमी सामोरे जावे लागणार्‍या ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी एक नवा पर्याय मिळावा या दृष्टीने ‘ट्राय’ने हा
प्रस्ताव मांडला होता.
दूरसंचार मंत्रालयांतर्गत आयोगाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि इतर ऑपरेटर्स इंटरनेट टेलिफोनी सेवा सुरू करू शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीसाठी नवे पर्याय मिळणार असून त्याचा फायदा होईल. खास करून ज्या ठिकाणी नेटवर्कची प्रचंड समस्या आहे, त्या ठिकाणी ग्राहकांना अजून एक पर्याय उपलब्ध होईल. ज्या इमारती आणि घऱांमध्ये मोबाइल नेटवर्क मिळत नाही आणि जेथे वाय-फाय नेटवर्क चांगले आहे, त्या ठिकाणीही याचा फायदा होईल, असे ‘ट्राय’चे सल्लागार अरविंदकुमार यांनी सांगितले.
इंटरनेट टेलिफोनीचा वापर करायचा असेल तर ग्राहकाला ऑपरेटरने ऑफर केलेले अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर ग्राहकाला दहा अंकी नवा क्रमांक मिळेल. हा क्रमांक मोबाइल क्रमांकाप्रमाणेच असेल. तुम्ही सध्या एअरटेलचे सिम कार्ड वापरत असाल आणि इंटरनेट टेलिफोनीसाठी रिलायन्स जिओचे टेलिफोनी अ‍ॅप डाऊनलोड केले तर ब्रॉडबँडचा वापर करून याच याच क्रमांकावरून तुम्ही कॉल करू शकाल. मात्र, तुम्ही सध्या ज्या कंपनीचे सिमकार्ड वापरत आहात, त्याच कंपनीचे टेलिफोनी अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड केले तर तुम्हाला सध्या आहे त्याच क्रमांकावर ही सुविधा मिळू शकेल.
राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल
डी. के. जगदाळे यांची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्निर्माण बोर्डाच्या मुख्य अधिकारीपदी, वीरेंद्रसिंग यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी, ठाण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी, प्रदीप पी. यांची माहिती तंत्रज्ञान संचालकपदी, संजय यादव यांची ठाण्याच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी, सी. के. डांगे यांची जळगाव महापालिका आयुक्तपदी, पी. सिव्हा संकर यांची महाराष्ट्र राज्य सहकार आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी, शंतनू गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, विजय राठोड यांची गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, राहुल कर्डिल्ले यांची एकात्मिक आदिवासी विकास योजनेच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारीपदी तर कैलाश पगारे यांची अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: