Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाच प्रकरणातील फरार गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना अटक
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणातील फरार संशयित आरोपी  वंदना वळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक  करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी, सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली. वेतनश्रेणी फरक बिल काढून ते मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षक प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुुरव व गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना भेटले असता दोघींनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. लाचेची रक्कम सोमवारी स्वीकारणार असल्याचे ठरल्यानंतर सातारा एसीबीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सापळचा रचला. सोमवारी सायंकाळी पुनीता गुरव यांनी शिक्षण विभागाच्या त्यांच्या केबिनमध्ये लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना अटक करण्यात आली. 
सोमवारी एसीबीच्या पथकाने पुनीता गुरव यांना अटक केल्यानंतर वंदना वळवी यांना अटक करण्यासाठी पोलीस गेले. मात्र वळवी पसार झाल्या होत्या. वंदना वळवी मूळच्या सातारा जिल्ह्यातील असून त्यांचे सासर नंदूरबार असल्याने पोलीस तपासाला तिकडेही गेले. मात्र तरीही पोलिसांना त्या सापडल्या नाहीत. अखेर शुक्रवारी दुपारी वंदना वळवी पोलिसांना सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्ला तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: