Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंडणी देण्यास नकार देणार्‍या पानटपरी चालकावर तलवार हल्ला
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 11 :  खंडणी देण्यास नकार देणार्‍या देगाव फाटा येथील पानटपरी चालकावर टोळक्याने गुरुवारी रात्री उशिरा तलवार हल्ला केला. या घटनेमुळे देगाव फाटा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये श्रीकांत जाधव ऊर्फ पप्पू पॅरागॉन, संदीप जाधव ऊर्फ पप्पू टीस, गणेश भोसले, अभिजित आबा जाधव व इतर दोन ते तीन जणांचा समावेश आहे. 
या प्रकरणी तेजस भारत भंडलकर (वय 22, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तेजस भांडवलकर यांचा देगाव फाटा येथे पानटपरीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजता ते पानटपरी बंद करून घरी निघाले होते. यादरम्यान तेथे संशयित सर्वजण आले. त्यातील श्रीकांत याने तक्रारदार यला ‘मला हप्ता देऊन धंदा करायचा, नाहीतर धंदा बंद करायचा,’ अशी धमकी दिली. त्यावेळी तेजसने ‘हप्ता देणे परवडत नाही,’ असे सांगितले. या कारणातून चिडून जावून संशयित चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. ही वादावादी सुरु असताना एकाने थेट तलवार काढून वार केला. तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत तेजस गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: