Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुन्ह्याचा तपास करण्यास नकार देणारा हवालदार निलंबित
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करण्यास नकार दिल्याने कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार यु. बी. माने यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले. माने यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
पोलीस हवालदार यु. बी. माने हे कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चोरीचा एक गुन्हा दाखल झाला असून तो त्यांच्याकडे तपासण्यासाठी दिला होता. माने यांनी मात्र तो गुन्हा तपासण्यासाठी नकार दिला. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बेशिस्त, बेजबाबदार वागणुकीचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले. शुक्रवारी दुपारी याबाबत मुख्यालयातून प्रसिध्दीपत्रक काढण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: