Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मारहाणीत युवक जखमी
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 13 : येथील  शनिवार पेठेत राहणार्‍या एका युवकास कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी येथील युवकाने मारहाण केली. जखमी युवकाचे उमेश शाळीग्राम कांबळे (वय 24, रा. शनिवार पेठ, सातारा) असे  नाव आहे. त्यास उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमेश  कांबळे याला गोगावलेवाडी येथील सोमनाथ  पवार या युवकाने मारहाण केली. उमेश समवेत त्याचा मित्र गौतम आबा आवटेही उपस्थित होता. या मारहाणीनंतर उमेश कांबळे स्वत:हून रिक्षाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: