Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फ्रान्स, इंडोनेशियात दहशतवादी हल्ला; 13 ठार, अनेक जखमी
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. आजचा रविवार हा दहशतीचा रविवार आहे की काय असा प्रश्‍न पडावा अशा घटना घडल्या आहेत. इंडोनेशियात चर्चवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयसीएसच्या हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
इंडोनेशियात 9 ठार 41 जखमी
इंडोनेशियात चर्चवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला तर 41 जण जखमी झाले आहेत. इंडोनेशियामधील जावा शहराच्या पूर्वेकडील सुरबाया इथल्या तीन वेगवेगळ्या चर्चमध्ये स्फोट झाले आहेत.  हे सर्व स्फोट अवघ्या दहा मिनिटांमध्ये घडवून आणण्यात आले. पहिला स्फोट सकाळी साडेसात वाजता झाला. सांता मारिया कॅथलिक चर्चवर झालेल्या हल्ल्याची ही माहिती आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पॅरिसमध्ये 2 ठार अनेक जखमी
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 
पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. पॅरिसच्या मध्यवर्ती भागात एका अज्ञात व्यक्तीने जवळपास असलेल्या लोकांवर चाकूहल्ला करायला सुरूवात केली. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमी चौघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गेल्या 3 वर्षात फ्रान्समध्ये अशा अनेक घटना घडल्या असून यात अनेक लोकांचा जीव गेलाय.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: