Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संदीप भणगे खून प्रकरणातील संशयित प्रसाद कुलकर्णीची जेलमध्ये रवानगी
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : मंगळवार तळे येथे संदीप भणगे  (वय 32, रा. व्यंकटपुरा पेठ) यांचा खून करणारा संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी याला  खून प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यास दोनवेळा पोलीस कोठडी  दिली होती. रविवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. या खून प्रकरणात एकच संशयित आरोपी असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 मे रोजी संदीप भणगे हे दुचाकीवरुन निघाले होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास संशयितप्रसाद कुलकर्णी याने जुन्या भांडणाच्या कारणातून न्यायालयात सुरु असलेली केस मागे घे, असे म्हणून लोखंडी पाइपने त्याच्यावर हल्ला केला. प्रसाद याने संदीप यांच्या डोक्यात वर्मी घाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले व जागीच कोसळले. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी संदीप यांचे वडील त्यांना शोधत येत असताना त्यांच्या डोळ्यासमोर ही घटना घटली होती.
संदीप भगणे यांच्या खुनानंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला.
संशयित प्रसाद कुलकर्णी याला घटनेनंतर अवघ्या चार तासात शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दि. 6 रोजी प्रसाद याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली. पहिली पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. संशयित प्रसादला रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार देशमुख, चंद्रकांत कुंभार, लैलेश फडतरे, फरास, घाडगे, लेंभे, काशीद, पवार, मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.
   

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: