Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादीचे तिकीट मलाच : खा. उदयनराजे
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 13 : लोकशाहीत प्रत्येक जण राजा आहे. त्यामुळे कोणाला उभे राहायचे असेल त्यांनी खुशाल उभे रहावे. लोकांचा मला आग्रह असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकीट मलाच देणार. तसे न झाल्यास अपक्ष उभा राहणार असल्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, सगळंच सांगायला लागलो तर कसे होईल. लोकांनी मला काम करण्याची संधी दिली आहे. मी ते करतच राहणार आहे.
निवडणुकीची तयारी काय करायची असते. त्यावर माझे पोट चालत नाही. माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मी सर्वांना दिले. परंतु काही जण आले नाहीत. लोकशाही असल्याने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मात्र राजेशाही असती तर सांगितले असते. मी निमंत्रण देऊन ते येत नाहीत आणि तेही मला निमंत्रण देत नाहीत. त्यामुळे मीही न बोलावता जाणार नाही.
खासदार झाल्यापासून कराड व पाटण तालुक्यात केलेल्या विकासकामांबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, कराड-पाटण तालुक्यात मी केलेल्या कामांची यादीच देणार आहे. कराड नगरपालिकेला कितीही सांगितले तरी ठराव देत नाहीत. त्याला राजेंद्र यादव एकटे जबाबदार नाहीत. सर्वांनी मिळून ठराव दिला पाहिजे. ही  परिस्थिती वाईट असून विकासकामांचे श्रेय दुसर्‍याला जाईल म्हणून राजकारण होत आहे. मुख्याधिकारी यामध्ये आडकाठी आणत आहेत.
बघून घेईल म्हणणारांनी मैदानात यावे
माझे काय चुकत असेल तर त्यांनी मला अवश्य सांगावे. पण कोणी अरेरावी करीत असेल तर ती मी सहन करणार नाही. मी काय बांगड्या घातल्या नाहीत. बघून घेईल म्हणणारांनी मैदानात यावे. शांत बसतो म्हणून कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: