Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराडमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणारे एलसीबीकडून जेरबंद
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 14 : कराडमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणार्‍या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्याकडून 92 हजार 605 ची रोकड, 1 लाख 8 हजार 502 रुपये किंमतीचे 8 मोबाईल हँडसेट असा एकूण 2 लाख 1 हजार 107 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप शशिकांत पवार (वय 33, रा. 370, रविवार पेठ, कराड), अमोल शंकर दावणे   (वय 29, रा. बाराडबरी झोपडपट्टी, कराड), विजय विलास चव्हाण (वय 35, रा. 458, सोमवार पेठ, कराड) आणि अमोल जयवंतराव पवार (वय 35, रा. 363, रविवार पेठ, कराड) आणि विजय विष्णू वायदंडे (वय 35, रा. 78, बुधवार पेठ, कराड) यांचा समावेश आहे. कराड शहरात गेल्या महिन्यापासून आयपीएल-2018 क्रिकेट
मॅचवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या अधिपत्याखाली एक टिम तयार करून कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विकास जाधव व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेवून रविवार पेठ, कराड येथील कोष्टी गल्लीमध्ये एका घराच्या आडोशास क्रिकेटवर सट्टा घेणार्‍यास पकडले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: