Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांचे सबलीकरण हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रध्दांजली
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 16 : स्व. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून आलौकिक अशी क्रांती घडवली. अजिंक्य उद्योग समूहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करुन त्यांनी सर्वांना सहकारातून उध्दाराकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरुन वाटचाल करुन शेतकरी हित जोपाण्यासाठी सहकार चळवळ जोमाने सुरु ठेवू, असा निर्धार स्व. आ. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त करण्यात आला. 
सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिंक्य उद्योग समूहाचे संस्थापक स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी 10.30 वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि; शेंद्रे कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पूर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास विविध मान्यवर व असंख्य कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत  शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्‍वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, कारखाना संचालक मंडळातील सदस्य, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ.वनिता गोरे, सदस्य शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराज यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो. या दिवशी एकत्र येवून सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले महान कार्य, त्यांची विचारसरणी, आत्मसन्मानपूर्वक वागणूक, निस्वार्थी व अभ्यासू वृत्ती आदी बाबत चिंतन व मनन करुन त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांची कास धरुन सहकार चळवळ वृध्दिंगत करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अंगिकारलेली विकासकामांची धुरा त्यांचे आचार, विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी आपण सर्व जण कटिबध्द राहू, असे अभिवचन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सातारा तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यासह राज्यभरात असंख्य सहकारी संस्थांच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. केवळ सहकारी संस्था उभारुन चालणार नाही तर, त्यांना पाठबळ दिले पाहिजे, त्या संस्था उभारीस येवून त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकर्‍यांना झाला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी सहकारमंत्री असताना राज्यभरातील सर्वच सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरु आहे. ही चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करण्याची शपथ उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन केले.
स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंती कार्मक्रमाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर श्री.समर्थ रामदास स्वामी प्रासादिक भजनी मंडळ, निगूडमाळ यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा नगर परिषदचे नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्यामार्फत पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळातील आजी,माजी सदस्य, अजिंक्य उद्योग समूहाचे पदाधिकारी, चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, रवींद्र कदम, सातारा पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, सदस्या छाया कुंभार, कांचन काळंगे, बेबीताई जाधव, धर्मराज घोरपडे, आनंदराव कणसे, दादा शेळके अरविंद चव्हाण, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सूर्यकांत धनवडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनाजी शेडगे, अजिंक्यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला संस्थेचे मनोहर साळुंखे, अजिंक्यतारा वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, सूत गिरणीचे अध्यक्ष रामभाऊ जगताप, उपाध्यक्ष हणमंत देवरे, पंडितराव सावंत, गणपतराव मोहिते, जावली तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जयदीप शिंदे, पंचायत समिती सभापती अरुणा शिर्के, अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्यध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, कामगार युनियनचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजीराव कदम, कार्यकर्ते, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी-कर्मचारी-कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सुरुची या निवास्थानीही स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी सातारा व जावली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन करुन आदरांजली अर्पण केली. सातारा तालुक्यातील भाऊसाहेब
महाराज प्रेमी कार्यकर्त्यांनी ठिकठिकणी सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा पंचायत समिती, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती, सातारा तालुका खरेदी-
विक्री संघ आदींसह सातारा तालुक्यातील विविध सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. वेदांत हेल्थ केअर सेंटर, पुष्कर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, विसावा नाका येथे डॉ. अमोल ढवळे यांच्यावतीने मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. सातारा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी विविध सहकारी संस्था, मंडळे व स्व. अभयसिंहराजे भोसले प्रेमी ग्रामस्थांच्यावतीने अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: