Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यात सरपंचपदासाठी 18 व सदस्यांसाठी 120 जण रिंगणात
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: re5
5पाटण, दि. 16 : पाटण तालुक्यातील 11 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवार दि. 16 रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 30 व सदस्यपदासाठी 96 अशा एकूण 126 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 7 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी  18 व सदस्यपदांसाठी 120 असे एकूण 138 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. दरम्यान, कळकेवाडी, रामिष्टेवाडी व नवसरवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर येराडवाडी येथे सरपंचपद रिक्त असल्याने केवळ सदस्यांसाठीच निवडणूक होत आहे.
पाटण तालुक्यातील सार्वत्रिक 11 ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदासाठी 52 व सदस्यपदांसाठी 238 व पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल झाले होते. सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व अर्ज वैध ठरले होते तर पोटनिवडणुकीतील 3 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी बुधवार दि. 16 रोजी मल्हारपेठ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 5, सदस्य पदासाठी 17 जणांनी माघार घेतली त्यामुळे सरपंचपदासाठी 3 व सदस्यांसाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत. नारळवाडी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी 2 उमेदवार आहेत तर सदस्यांसाठी 5 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार रिंगणात आहेत. आ. शंभूराज देसाई यांच्या मरळी ग्रामपंचायतीत गटांअतर्गत दोन पॅनेल पडल्याने सरपंचपदासाठी 2 जणांनी माघार घेतल्याने 2 उमेदवार व सदस्यांसाठी 8 जणांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गव्हाणवाडीमध्ये सदस्यांसाठी 4 जणांनी माघार घेतल्याने सर्व वॉर्ड बिनविरोध झाले तर सरपंचपदासाठी दोघांनी माघार घेतली. येथे दोन अर्ज शिल्लक राहिल्याने केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.  कळकेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 9 जणांनी माघार घेतल्याने 3 उमेदवार व सदस्यांसाठी 29 जणांनी माघार घेतल्याने 22 उमेदवार रिंगणात आहेत. येथे राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील, काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांच्यासह तिरंगी लढत होत आहे. मंद्रुळकोळे खुर्दमध्ये सरपंचपदासाठी 5 जणांनी माघार घेतल्याने 2 जण रिंगणात आहेत तर सदस्यांसाठी 17 जणांनी माघार घेतल्याने 14 जण रिंगणात आहेत.
रामिष्टेवाडी येथे सरपंचपदासाठी 3 तर सदस्यांसाठी 2 जणांनी माघार घेतल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. नवसरवाडीत सरपंचपदासाठी 1 व सदस्यांसाठी 9 जणांनी माघार घेतल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. येराडवाडी येथील सरपंचपद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित होते. मात्र, येथे या पदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहिले आहे. येथे सदस्यांसाठी 4 जणांनी माघार घेतल्याने 10 जण रिंगणात आहेत. जमदाडवाडीमध्ये सरपंच पदासाठी 2 जणांनी माघार घेतल्याने 2 उमेदवार व सदस्यांसाठी 1 अर्ज मागे घेतल्याने 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
पाटण तालुक्यातील 11 सार्वत्रिक ग्राम-पंचायतींच्या 7 सरपंचपदासाठी 18 व सदस्यपदांसाठी 120 असे एकूण 138 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. 72 ठिकाणच्या  पोटनिवडणुकीसाठी केवळ 2 ठिकाणीच अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एक अर्ज अवैध ठरल्याने कोचरेवाडी व मानेगाव या दोन्ही ठिकाणच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अतिसंवेदनशील समजल्या जाणार्‍या तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये पाटणकर गट-देसाई गट-शिवसेना (हर्षल कदम) अशी तिरंगी लढत होत आहे. ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे खुर्द येथे दुरंगी व मंद्रुळकोळे येथे तिरंगी लढत होत असल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: