Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

चेन्नई सुपर किंग्ज ठरला आयपीएलचा बादशहा
ऐक्य समूह
Monday, May 28, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: sp1
5मुंबई, दि. 27 (वृत्तसंस्था) : येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या यंदाच्या मोसमातील आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने वॉटसनच्या नाबाद 117 धावांच्या जोरावर सनराईजर्स हैद्राबादचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत सनराईजर हैद्राबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेला हा निर्णय त्याच्या धुरंदर गोलंदाजांनी यशस्वी ठरवत हैद्राबादला 20 षटकात 6 बाद 178 धावांवर रोखले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.3 षटकात 181 धावा करत यंदाच्या आयपीएल टी-20 चषकावर आपले नाव कोरले. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो वॉटसन. त्याने नाबाद रहात 57 चेंडून 8 षटकार व 11 चौकारांची आतषबाजी  करत 117 धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीच्या जोरावरच हैद्राबादवर चेन्नईला सहज विजय मिळवता आले. चेन्नईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी चेन्नईने 2010 व 2011 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी आली होती. बंदीनंतर यावर्षीच्या हंगामात चेन्नईने पुनरागमन केले. या संघात जवळपास 6 खेळाडू वरिष्ठ होते. तरीही धोनी ब्रिगेडने धडाकेबाज कामगिरी करत या चषकावर आज आपले नाव कोरले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: