Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतीय सैन्याला डिवचल्यास पाकला जशास तसे उत्तर देऊ : सीतारामन
ऐक्य समूह
Wednesday, June 06, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था):‘लष्कराचा सल्ला घेऊनच रमजानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो. पण भारतीय सैन्याला डिवचले तर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ,’ असा खणखणीत इशारा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी पाकिस्तानला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करताना निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला. ‘दहशतवादी कारवाया आणि शांततेसाठीच्या चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाहीत, हे परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. आमच्या सरकारची ही भूमिकाच असून चर्चा करायची असेल तर दहशतवादी कारवाया थांबल्या पाहिजेत,’ असे त्यांनी सांगितले.
‘शस्त्रसंधी यशस्वी झाली की नाही याचे मूल्यांकन करण्याचे काम संरक्षण मंत्रालयाचे नाही. आमचे काम सीमेचे रक्षण करणे आहे. तेच आम्ही करत आहोत. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा लष्कराकडे अपुरा शस्त्रसाठा होता. परंतु आज देशात शस्त्रसाठ्याची कमतरता नाही,’ असे त्या म्हणाल्या. लष्कराकडे निधीची कमतरता नसल्याचे सांगतानाच त्यांनी आकडेवारीच जारी केली.     
आम्ही लष्कराच्या उपप्रमुखांना निधी खर्च करण्याचा अधिकार दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राफेल घोटाळा, क्लीन चीट
दरम्यान, राफेल डील प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सांगत सीतारामन यांनी क्लीन चीट दिली आहे. राफेल डील बाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही. हा दोन्ही सरकारांमधील करार आहे, असेे त्यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: