Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उद्योजकांना मारहाण करत वर्कशॉप जाळण्याचीधमकी
ऐक्य समूह
Wednesday, June 06, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : कामगारास मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन  उद्योजकाला मारहाण करण्यात आली असून त्यांचे वर्कशॉप जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा एमआयडीसी येथे प्रतीक बर्गे (रा. चिंचणेर वंदन, सातारा) यांचे फेटलिंग वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये सुयोग हरिश्‍चंद्र कदम कामाला आहेत. कदम यांना सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास माणिक सावंतसह पाच जणांनी  मारहाण केली. त्यावेळी प्रतीक बर्गे आणि तानाजी मारुती बर्गे या दोघांनी भांडणे सोडवली आणि कदम यांना का मारहाण करत आहात, असा जाब विचारला. त्यावरुन चिडून जावून सावंत व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने प्रतीक व तानाजी या दोघांना मारहाण केली आणि त्यांचे वर्कशॉप जाळून टाकण्याचीधमकी दिली. फौजदार शेख तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: