Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रेपो दर वाढल्याने कर्जाचा हप्ताही वाढणार
ऐक्य समूह
Thursday, June 07, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : देशातील जनता आधीच महागाईने होरपळलेली असताना रिझर्व्ह बँकेने व्याज दरात वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. आरबीआयने रेपो रेटच्या दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार आहेच, शिवाय सर्वसामान्यांना बँकेतून कर्ज घेणे सुद्धा महागात पडणार आहे.
तीन दिवसाच्या मंथनानंतर आरबीआयने वार्षिक पतधोरण जाहीर करून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून तो 6.25 टक्क्यांवर नेण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांची वाढ नोंदवून तो 6 टक्क्यांपर्यंत गेला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच आरबीआयने रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे ईएमआयवर व्याज वाढणार आहे.
बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात.
जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागते. तर त्याउलट रेपो रेट वाढला तर बँकांना आरबीआयला जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करून फायदा मिळवून देता. मात्र जर तोटा झाला तर तोही ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. म्हणजेच वाढलेल्या रेपो दराचा सर्वसामान्य कर्जदारालाच फटका आहे. ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात त्या दराला रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे, तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: