Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा तहसील कार्यालय परिसरात बोगस उतारे देण्याचा प्रकार उघड
ऐक्य समूह
Friday, June 08, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: lo2
प्रशासकीय यंत्रणेतील सहभाग तपासा
5सातारा, दि. 7 : सातारा तहसील कार्यालय परिसरात एका टोळीकडून कोर्टासह ठिकठिकाणी लागणार्‍या जामिनासाठी बोगस सातबारा उतारे दिले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या माहितीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेतील यामध्ये कोणी सहभागी आहे का, हे तपासण्याची गरज आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना जामिनासाठी सातबारा उतार्‍याची आवश्यकता असते. अनेकदा अशी कागदपत्रे मिळण्यास अडचणी येतात. मात्र  सातारा तहसील कार्यालय परिसरात दोन ते पाच हजार  रुपयांपर्यंत बोगस सातबारा उतारा देणारे रॅकेट  कार्यरत आहे. एका व्हॅनमध्ये बसून हा धंदा  सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून लाखो बोगस सातबारा उतारे दिले गेले असल्याची माहिती पुढे येत आहे.
दखलपात्र व अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना जामिनाची आवश्यकता लागते. जामिनाच्या प्रक्रियेसाठी सातबारा आवश्यक असतो. मात्र सातार्‍यात जामिनाच्या प्रक्रियेसाठी गेल्या काही वर्षापासून बोगस सातबारे जोडले गेले असण्याची शक्यता आहेे.   दरम्यान, याच प्रकरणातून एका तक्रारदाराने गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून बोगस सातबारा उतारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: