Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चंदा कोचर अमेरिकेच्या रडारवर
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:54 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : बँकेतील गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आता अमेरिकेच्या रडारवर आल्या आहेत. अमेरिकेचे मार्केट रेग्युलेटर एसईसी (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन) सुद्धा कोचर आणि आयसीआयसीआय बँकेची बँकेतील अनियमितते प्रकरणी चौकशी करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चंदा कोचर यांची बँकेतील कथित अनियमितते प्रकरणी भारतीय तपास यंत्रणांनी या पूर्वीच चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतरही कोचर यांच्यावर बँकेचा संपूर्ण विश्‍वास असल्याचे बँकेच्या बोर्डाने स्पष्ट केले होते. दरम्यान, अमेरिकन मार्केटमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मोठे जाळे असल्याने अमेरिकेच्या एसईसी या यंत्रणेने बँकेतील गैरव्यवहार प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. एसईसीने या प्रकरणात लक्ष घातले आहे. या प्रकरणी एसईसी सेबीकडून अधिक माहिती घेण्याची शक्यता आहे. तर बँकेतील कथित अनियमितते प्रकरणी सेबीने कोचर यांना या पूर्वीच कारणे दाखवा  नोटीस पाठवली आहे. आयसीआयसीआय बँक व व्हिडिओकॉन ग्रुप तसेच न्यू पॉवर कंपनीत झालेल्या कर्जव्यवहारांबाबत ही नोटीस आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे न्यू पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: