Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुपवाडामध्ये सहा अतिरेक्यांना कंठस्नान
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:42 AM (IST)
Tags: re2
5कुपवाडा, दि. 10 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला. कुपवाड्याच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणार्‍या सहा अतिरेक्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये काही अतिरेकी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा दलाबरोबर त्यांची चकमक उडाली. त्यात सहा अतिरेकी ठार झाले. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले  असल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.
रमजानच्या पवित्र महिन्यात सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय भारताने जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत. केरन सेक्टरमध्ये रविवारी तिसर्‍यांदा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलाने तो हाणून पाडला. दरम्यान, शनिवारीही बांदीपोरा येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलादरम्यान चकमक झाली होती. काही अतिरेकी पनारच्या जंगलात लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: