Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिखर परिषदेत मोदींच्या चीन आणि पाकला कानपिचक्या
vasudeo kulkarni
Monday, June 11, 2018 AT 11:49 AM (IST)
Tags: mn1
5शांघाय, दि. 10 (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने चीन दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या आहेत. स्वायत्ता, आर्थिक विकासासह एससीओ परिषदेतील देशांच्या दरम्यान एकता आणि संपर्क असायला हवा. सदस्य देशांची स्वायत्ता आणि अखंडता अबाधित राखणार्‍या कोणत्याही प्रकल्पाचे आम्ही स्वागतच करू, असे सांगत मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचे कान टोचले.
चीनने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये इकॉनॉमिक कॉरिडोर प्रकल्प सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी एससीओ परिषदेतील प्लेनरी सेशनला संबोधित करताना चीन आणि पाकला कानपिचक्या दिल्या आहेत. यावेळी मोदी यांनी डएउणठए ची नवी परिभाषा सदस्य देशांना ऐकवली. ‘ड’ म्हणजे सेक्युरिटी ऑफ सिटीजन्स, ‘ए’ म्हणजे इकॉनॉमिक डेव्हल्पमेंट, ‘उ’ म्हणजे कनेक्टिव्हीटी इन द रिजन, ‘ण’ म्हणजे युनिटी, ‘ठ’ म्हणजे रिस्पेक्ट सॉवरनिटी अँड इंटिग्रिटी आणि ‘ए’ म्हणजे एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन, असा या सेक्युअर शब्दाचा अर्थ होत असल्याचे मोदी म्हणाले.
कनेक्टिव्हिटी म्हणजे केवळ भौगोलिक कनेक्शन नाही. तर एक-दुसर्‍यांच्या नागरिकांचा परस्पर संबंध, त्यांची जवळीक असाही कनेक्शनचा अर्थ होतो, असे सांगतानाच स्वदेशी, टिकाऊ आणि पारदर्शी प्रकल्पाचे आम्ही नेहमीच स्वागत करू. सदस्य देशाची सार्वभौमता आणि अखंडता कायम ठेवणार्‍या प्रकल्पांचेही आम्ही स्वागत करू, असा टोला मोदींनी चीनला लगावला.
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी  यावेळी कौतुक केले. गनी यांच्या कामाची सर्वच दखल घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद आणि कट्टरतावादाचे अफगाणिस्तान दुर्दैवी उदाहरण आहे, असे सांगत मोदींनी पाकिस्तानवरही निशाणा साधला. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: