Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरण परिसरात रिमझिम पाऊस
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: re4
धरणात 27.36 टीएमसी पाणीसाठा
5पाटण, दि. 11 : मृग नक्षत्रावर पाटण तालुक्यात पावसाने सुरूवात केली असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्र वगळता पाटण तालुक्यातील इतर विभागांमध्ये मान्सून म्हणावा तसा दाखल झाला नाही. गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरण परिसरात रिमझिम स्वरूपात पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे कोयनेत गेल्या चोवीस तासात 41, नवजा 31 व महाबळेश्‍वर येथे 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 27.36 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
कोकणामध्ये मान्सूनने जोरदार आगमन केले असले तरी कोकणाचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पाटण तालुक्यात मात्र अद्याप मान्सूनने म्हणावी तशी सुरूवात केलेली नाही. पाटणसह तालुक्यातील मणदुरे, तारळे, मोरगिरी, मल्हारपेठ, चाफळ परिसरात अद्याप दमदार पावसाने सुरूवात केलेली नाही. मात्र तालुक्यातील कोयना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रिपझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तालुक्यातील इतर विभागांमध्ये दिवसभर नुसत्या काळ्या ढगांचे आच्छादन पसरत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसह सर्वच जण दमदार पावसाची वाट पहात आहेत.
दरम्यान कोयना धरण परिसरात गेल्या चोवीस  भाग्यश्री टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हर्लसच्या जीपमधून (क्र. एम. एच. 42 क्यू 574) रात्री 8 च्या सुमारास मुंबईला निघाले होते. फलटण, लोणंद मार्गे जाताना लोणंदच्या पुढे एका ढाब्यावर ते जेवण करण्यासाठी थांबले. यावेळी चालक महेश बल्लाळ याने दारू पिली. तो दारू पिऊन गाडी वेगाने चालवत होता. पाडेगाव जवळील कॅनॉलच्या वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप थेट कॅनालमध्ये पडली. कॅनॉलला पाणी सोडलेले असल्यामुळे पाण्याच्या वेगाने जीप पाण्यातच एका बाजूला उभी राहिली. या अपघाताचा आवाज ऐकून कालव्यालगत   पाडेगाव येथील नवले कुटुंबातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान एका अपघातातील आरोपीच्या शोधात असलेले लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि. सोमनाथ लांडे व त्यांचे  सहकारी सहाय्यक फौजदार बी. व्ही. वाघमारे, कॉ. शिवाजी तोरडमल, कॉ. व्ही. बी. शिंदे, कॉ. एस. वाय. महामुलकर, कॉ. एल. बी. डोंबाळे, कॉ. विशाल वाघमारे, कॉ. संजय देशमुख, शिवसेना शहर प्रमुख सुनील यादव, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शेजारी असणारे  ग्रामस्थ  निखिल नवले, रोहित नवले यांच्यासह कॉ. अविनाश शिंदे व कॉ. रोहित गायकवाड यांनी पाण्यात उड्या मारून जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. सर्वच्या सर्व नऊ जणांना लोणंद येथील डॉ. नितीन सावंत, डॉ. दीपक गोरड, डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. किशोर बुटीयानी, डॉ. सौ. स्वाती शहा, डॉ. जयेश रावळ यांच्या दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले. परंतु चालक महेश जगन्नाथ बल्लाळ, कु. सृष्टी साळुंखे, गोरख बल्लाळ यांचा मृत्यू झाला. अविंदा संतोष साळुंखे, सुजल संतोष साळुंखे, उज्ज्वला गोरख बल्लाळ हे तिघे गंभीर जखमी आणि संतोष साळुंखे, सुधीर बल्लाळ, गोरख बल्लाळ किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सपोनि. सोमनाथ लांडे तपास करत आहेत.
अपघातातील जखमी संतोष साळुंखे हे मुंबईमध्ये पेंटिंगची कामे करतात तर त्यांच्या मामाचा मुलगा सुधीर बल्लाळ हा मुंबई येथे खाजगी नोकरी करतो. ही दोन्ही सामान्य कुटुंबे मुंबईला पोटापाण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सृष्टी व गोरख या दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने हा अपघात लवकर झाल्याने जखमींना बाहेर काढणे व उपचार करणे शक्य झाले. जखमींना बाहेर काढताना अंधार असताना तसेच कॅनॉल पाण्याने तुडुंब भरून वाहत असतानाही जीवाची पर्वा न करता पोलीस व ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून प्राण वाचविले.
जीप चालक महेश बल्लाळ याला गाडीतील प्रवासी हळू गाडी चालव असे सांगत असतानाही तो गाडी भरधाव वेगाने चालवत होता. दारू पिल्यामुळे त्याचा गाडीवर ताबा राहिला नाही आणि हा अपघात झाला. जीपमध्ये गावातील एक व फलटण येथील एक जण बसणार होते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
अपघाताची फिर्याद सुधीर बल्लाळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली असून सपोनि. सोमनाथ लांडे तपास करत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: