Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेला कोल्हा.
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: re1
अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
5पाटण, दि. 11 : नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर सांगवड पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर कोयना नदीवर असलेल्या सांगवड पुलावर सोमवारी पहाटे रस्ता ओलांडत असणार्‍या कोल्ह्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. हा कोल्हा पुलावरून जाताना अचानक गाडी पुलावर आल्याने कोल्ह्याने पळण्याचा प्रयत्न केला असणार. परंतु दोन्ही बाजूला पुलाचे कठडे असल्याने गाडीची कोल्ह्याला मागून जोरदार धडक बसली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला, असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  
दरम्यान, ही घटना सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती
दिली. पाटण वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी व्ही. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठचे वनपाल आर. एस. घावटे, बहुलेचे वनरक्षक डी. बी. बर्गे, चाफळचे वनरक्षक दिलीप वाघमारे, वनकर्मचारी रमेश कदम यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत कोल्हा हा नर जातीचा साधारण दोन ते तीन वर्षाचा असल्याचे वन अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: