Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधी आज मुंबईत बूथ कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मुंबईत येत असून गोरेगाव येथे आयोजित बूथ कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी, न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजेरी लावणार आहेत.
राहुल गांधी यांचे उद्या सकाळी दिल्लीहून आगमन होईल. त्यानंतर ते थेट भिवंडीला जातील. दुपारी गोरेगाव येथील एनसीसी मैदानावर आयोजित बूथ कार्यकर्ता मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. मुंबई काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलेल्या भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या पुस्तिकेचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते गोरेगाव येथील मेळाव्यात होणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: