Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरा उजव्या कालव्यात जीप पडून चालकासह दोन मुलांचा मृत्यू
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: re3
6 जण जखमी, तिघे गंभीर, मृत व जखमी माण तालुक्यातील रहिवासी
5लोणंद, दि. 11 : लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगाव गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालवा पुलाजवळून वावरहिरे, ता. माण येथून मुंबईकडे निघालेली जीप रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने थेट कालव्यामधील वाहत्या पाण्यात पडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन लहान मुले व चालक  अशा तिघांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. त्यापैकी तिघे गंभीर आहेत. 
मयत व जखमी दावलेवाडी व बल्लाळवाडी, ता. माण या दोन गावातील आहेत. पाडेगाव ग्रामस्थ व लोणंद पोलिसांनी पाण्यात उड्या मारून जखमींना त्वरित बाहेर काढून लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचले. अन्यथा मृतांचा आकडा वाढला असता. महेश जगन्नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (वय 4) दोघे  रा. बल्लाळवाडी, सृष्टी संतोष साळुंखे (वय 9, रा. दावलेवाडी) अशी मयतांची नावे आहेत.
 वावरहिरे, ता. माण येथून साळुंखे व बल्लाळ या  दोन कुटुंबातील सात जणांसह नऊ जण  पकडीने तार बसविण्याच्या प्रयत्नात दिगंबरला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. वीज कंपनीच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: