Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खरशिंगे येथे मोटरसायकलींच्या अपघातात दोन जण जागीच ठार
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re2
5पुसेसावळी, दि. 11 :  खरशिंगे, ता. खटाव येथील जगताप वस्ती समोर दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले.
पळशी-औंध रस्त्यावर पळशीपासून सुमारे 3 कि.मी. अंतरावर असलेल्या जायगाव, ता. खटाव येथील रणजित पांडुरंग देशमुख (वय 30) व औंध, ता. खटाव येथील शंकर तुकाराम रणदिवे (वय 40) या युवकांचा दोन मोटरसायकलींमध्ये (सीडी. डॉन क्र. एम. एच.-11-एस 9506 व हिरो होंडा एच.एफ.डिलक्स क्र. एम. एच. 11सीए 5170) भीषण अपघात झाला. त्यात दोन्ही युवक जागीच ठार झाल्याचे डॉ.परीट यांनी सांगितले. घटनास्थळी औंधचे सपोनि. सुनील एल. जाधव, हवालदार पाटील यांनी तत्काळ भेट दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: