Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण येथे माथेफिरूकडून शहीद स्मारक, दुकाने व वाहनांची तोडफोड
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 12 : बारामती चौक, उघडा मारुती मंदिर परिसरात अज्ञात माथेफिरूने सोमवार, दि. 11 रोजी रात्री 10 च्या सुमारास येथील शहीद स्मारक, दुकाने, वाहनांची तोडफोड केली असून त्याबाबत अद्याप पोलीस अथवा अन्य शासकीय यंत्रणेने दखल घेतली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
शहीद स्मारकाचे गज किंवा तत्सम हत्याराने तोडफोडीचा प्रयत्न केला असून या माथेफिरूने आरिंजय दोशी यांची मारुती व्हॅन (क्र.एम एच. 13- 3493), एक स्कूटी (क्र.एम. एच. 12 एचजे 8652) या दोन गाड्यांची तोडफोड करून पूर्णपणे नुकसान केले आहे तसेच किरकोळ विक्रेते हारून डांगे यांची टपरी,जिलेबी विक्रेत्याची खुर्ची व स्टूलची तोडफोड आणि अशोक हिप्परकर यांच्या चुना विक्रीच्या दुकानाचे नुकसान केले आहे. इतर काही दुकानांचे किरकोळ नुकसान या माथेफिरूने केले आहे. गेल्या 15/20 दिवसांपासून शहरातील पथ दिवे बंद असल्याने अशा भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. या तोडफोडीच्या घटनेने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. शहरात विविध ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने गुन्हेगारीस आळा बसला असल्याने आता बारामती चौक ते नगरपालिका दरम्यान सी. सी. टीव्ही कॅमेरे त्वरित बसवून घेण्याची मागणीही व्यापार्‍यांनी केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: