Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आपचा दिल्लीमध्ये मोर्चा
ऐक्य समूह
Monday, June 18, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : आम आदमी पक्षाच्यावतीने आज (रविवार) मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान हा मोर्चा पोलिसांनी संसद मार्गावरच रोखून धरला.
दिल्ली येथे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात तीव्र संघर्ष झाला आहे. त्याचा परिणाम आज आम आदमी पक्षाने नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधानांच निशाण्यावर घेण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. परंतु हा मोर्चा संसद मार्गावर रोखण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी आपच्यावतीने हो मोर्चा काढण्यात आला. मोर्चात खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
अरविंद केजरीवाल गेल्या आठवड्यापासून एलजी हाऊसमध्ये धरणे धरून आहेत. दिल्लीतील अधिकारी संपावर असून यामुळे सरकारच्या कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. परंतु, दिल्लीतील आयएएस संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सर्व विभागातील अधिकारी कामावर असल्याचा दावा केला आहे. आपचा मोर्चा निघणार असल्यामुळे पंतप्रधान निवासाजवळील 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. लोक कल्याण मार्ग स्टेशन, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन आणि जनपथ मेट्रो स्टेशन आज दुपारी 2 पासून बंद करण्यात आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: