Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अरविंद केजरीवाल नक्षलवादी : स्वामी
ऐक्य समूह
Monday, June 18, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचे वक्तव्य केले आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काहीच समजत नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, केजरीवाल यांनी टू जी घोटाळ्यावरून सुरू केलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलनही हस्तगत केले होते. अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. केजरीवाल हे 420 असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: