Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप
ऐक्य समूह
Tuesday, June 19, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
महागाई भडकणार
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी सोमवारपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील 60 टक्के ट्रकचालक सहभागी झाले आहेत. संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारचं इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्याने इंधन दरवाढ करण्यात आल्याचे कारण सरकार देत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या करांमुळे ही दरवाढ झाल्याचे आमचे मत आहे, असे ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी सांगितले.
आजच्या संपात 90 लाख ट्रक चालक उतरणार असल्याचेही ते म्हणाले. पश्‍चिम बंगालमध्ये 3.5 लाख ट्रक चालक संपात सहभागी झाल्याचा दावा बंगाल ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला.
केंद्र सरकार एक लिटर इंधनामागे आठ रुपये अधिभार आकारते. राज्याकडूनही 10.30 रुपये अधिभार आकारला जातो. एक कि.मी. रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच संप पुकारला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मालवाहतूकदारांचा संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास त्याचा भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: