Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल, डिझेलच्या दरात 14 पैशांची कपात
ऐक्य समूह
Friday, June 22, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर दररोज इंधनाचे दर वाढत असल्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महानगरांमध्ये गुरुवारी 11 ते 14 पैशांची कपात झाली.
वेगवेगळ्या शहरांमध्ये ही दरकपात वेगवेगळी आहे. मुंबईत पेट्रोल 11 पैसे तर चेन्नईत 12 पैशांनी स्वस्त झाले. 14 ते 29 मे या दरम्यान पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती. गुरुवारी डिझेलच्या दरातही 10 ते 14 पैशांची कपात झाली आहे. दिल्ली, कोलकाता व चेन्नईत 10 पैशांची तर मुंबईत 14 पैशांची कपात झाली. गेल्या 21 दिवसांमध्ये पेट्रोल एकूण 1 रुपया 53 पैशांनी तर डिझेल एकूण 1 रुपया 52 पैशांनी स्वस्त झाले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: