Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या दोन शिक्षकांवर गुन्हा
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6 : सातारा तालुक्यातील एका शाळेतील दोन शिक्षकांनी शिक्षिकेचा वारंवार विनयभंग करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश रघुनाथ कळबंटे (रा. खंडोबाचा माळ) व चंद्रकांत रतन रोकडे (रा. जानाई मळा, सातारा) या शिक्षकांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
दरम्यान, पहिल्यांदा विनयभंग केल्यानंतर शिक्षिका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना संशयितांनी हातापाया पडून, माफी मागितली आणि तक्रार न देण्याची विनंती केली. मात्र, त्यांची सवय गेली नाही. त्यानंतरही त्यांनी विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहेे. या प्रकरणी 32 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीतील माहिती अशी, संशयित शिक्षक व तक्रारदार शिक्षिका एकाच शाळेत कार्यरत आहेत. 2010 साली यातील एका शिक्षकाने शिक्षिकेचा हात पकडून विनयभंग केला. शिक्षिकेने प्रतिकार करून सुटका करून घेतली. त्या शिक्षिकेने त्याच वेळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. शिक्षिका तक्रार देणार या घटनेने शिक्षक घाबरला. त्याने तिच्या हातापाया पडून तक्रार न देण्याची विनंती केली.   भविष्यात पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. 2010 साली या घटनेवर पडदा पडला होता. मात्र, दोन्ही शिक्षकांनी पुन्हा त्या शिक्षिकेला त्रास देण्यास सुरुवात केली. दि. 1 मे रोजी पुन्हा गैरवर्तन करून विनयभंग केला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: