Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाडे परिसरात बिबट्याचा वावर : ग्रामस्थांमध्ये घबराट
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: re3
5मल्हार पेठ, दि. 6 :  नाडे, ता.पाटण येथील तेलेवाडी येथे  गुरुवारी 7 च्या सुमारास बिबट्याचा वावर घराशेजारी दिसून  आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरुण मधुकर चव्हाण, रा.नाडे (तेलेवाडी) यांच्या घराशेजारी असणार्‍या गोठ्यात बिबट्या घुसण्याच्या प्रयत्नात होता. मात्र जनावरांच्या धडपडीमुळे अरुण चव्हाण व त्यांचे कुटुंबीय तात्परतेने घराबाहेर आले असता त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली तसेच  ग्रामस्थांनी बिबट्याचा शोध घेवून त्याला हुसकावून लावण्यासाठी गस्त घालत असताना पुन्हा ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले.
बिबट्या जीवाच्या आकांताने उसाच्या शेतात पसार झाला. त्याच्या पायाचे ठसे आढळून आले. रात्र व पाऊस असल्याने बिबट्याचा शोध घेणे शक्य झाले नाही. मात्र भरवस्तीत बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, संबंधित विभागाने बिबट्याचा शोध घेवून, सापळा लावून बिबट्याला सापळ्यात जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: