Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वराडे दुर्घटनेतील गंभीर जखमी आईचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: re3
युवकाने पत्नीचा खून करून केला होता जीवघेणा हल्ला
5उंबज, दि. 8 : वराडे, ता. कराड येथील सागर घोरपडे या युवकाने 29 जून रोजी घरगुती कारणावरून पत्नी मोहिनी हिचा धारदार चाकूने भोसकून खून केल्यानंतर आईवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या सौ. कल्पना सदाशिव घोरपडे (वय 58) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी, उंब्रज, ता. कराड येथून जवळच असलेल्या वराडे येथील सागर सदाशिव घोरपडे (वय 36) याने घरगुती वादातून दि. 29 जून रोजी रात्री 9.30 च्या सुमारास पत्नी मोहिनी (वय 32) हिचा धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला होता. त्यानंतर आईवर जीवघेणा हल्ला करून तिला गंभीर जखमी   केल्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्दैवी घटनेत कल्पना घोरपडे व सागर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना सौ. कल्पना घोरपडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वराडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ. कल्पना यांना चाकूने झालेली जखम खोल असल्याने उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. उपचार सुरू झाल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रविवारी पहाटेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: